E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेऐवजी दहा वर्षांची शिक्षा
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
नागपूर
: दीड वर्षाच्या मुलीचा विनयभंग आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला अकोला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा रद्द करुन केवळ दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश नितीन सूर्यवंशी आणि प्रवीण पाटील यांनी निकाल दिला.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ८ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपी प्रशांत उर्फ गुड्डु इंगळे यांच्या विरोधात विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपानुसार, पीडित दीड वर्षीय मुलगी आईसोबत घरात होती. यादरम्यान आरोपी गुड्डु इंगळे घरात आला. आईने गुड्डुला घरात का घुसला ही विचारणा केली, मात्र त्याने उत्तर दिले नाही. यानंतर आई मदत मागण्यासाठी शेजारी राहणार्या वहिनीकडे गेली. तिथून परत येत असताना आरोपी दीड वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत असल्याचे तिला दिसले. तिने मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने पीडिताच्या आईचा हात ओढत तिच्यावरही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिने तात्काळ पोलिस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली. अकोला सत्र न्यायालयाने याप्रकरणी १ ऑगस्ट २०१९ रोजी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.आरोपीने या शिक्षेच्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले.. उच्च न्यायालयाने ते अंशत: मान्य करत आरोपीची शिक्षा कमी केली. आरोपीच्यावतीने एस.एस.दास यांनी तर राज्य सरकारच्या वतीने ड.एम.देशमुख यांनी बाजू मांडली.
दहा वर्ष शिक्षा पुरेशी...
बचाव पक्षाने उच्च न्यायालयात दावा केला की पीडिताचा विनयभंग झाला असल्याचे वैद्यकीय पुरावे नाहीत. आरोपीने न्यायालयात दावा केला पिडीतेच्या वडिलांनी त्याच्याकडून तीस हजार उधार घेतले होते. ही रक्कम परत मागण्यासाठी गेल्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. पीडिताच्या शरीरावर जख्म नसल्याचा युक्तिवादही आरोपीने न्यायालयात केला. उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळत सत्र न्यायालयाने निरीक्षण योग्य असल्याचे मत नोंदविले. मात्र, या गुन्ह्यासाठी जन्मठेप ही शिक्षा अतिशय कठोर व अतिरेकी स्वरुपाची आहे. आरोपीला दहा वर्षाची शिक्षा देणे न्याय करणे होईल, असे मत न्यायालयाने निर्णयात नोंदविले.
Related
Articles
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
04 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
04 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
04 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
04 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात